Search This Blog

About Me

Sunday, August 8, 2010

मी फ़क्त तुझ्यासाठी

सख्या, आज माझ मन खुप बेचैन झालय,
तुला डोलेभरून पाहण्यासाठी ते आतुर झालय,

असा एकही दिवस नाही की ज्यात
तुझी आठवन आली नाही,

एका क्षणात तू जवळ भासतो तर
दुसरया क्षणी तू कुठे हरवतोस??
पावसात भिजताना सुद्धा तूच का आठवतो ??

का सख्या??? का तू अस माझ्या मनाशी खेळतोस??
आपलस करून दूर का करतोस???
खर सांग ना रे…तुझ मन माझ्यासाठी
तुला असच छळत का??

हो.. सखा म्हणाला, हो ग सखे
तुझ्या आठवनिंत माझ मन मला खुप छळत,
क्षणात तुझ्या जवळ तर
क्षणात दूर कुठवर तरी पळत,
तुझ्या प्रेमात भिजण्यासाठी ते आतुरत,
तुझ्या डोळ्यांत सामावन्यासाठी ते वेड होत,
तुझ्या ओठांना स्पर्श करण्यासाठी ते खुदकन हसत,
खरच .. सखे तुझ्यासाठी ते रात्रंदिवस झुरत…

बस !! बस सख्या अजुन
काही नको बोलू
हृदयात वसलेल्या भावनांच
दार अस नको खोलू,

का ग सखे ?? तुला नाही का अस वाटत ???
वाटत ना..खुप काही वाटत…
पण… भीतीही वाटते , तुला अर्ध्यावर सोडून जाण्याची…

वेडी आहेस तू…
तुझ नि माझ मन एकमेकांत गुंतल आहे
तू माझ्यासाठी अन मी फ़क्त तुझ्यासाठी आहे..

No comments:

Post a Comment