Search This Blog

About Me

Thursday, September 30, 2010

आपलं नातं

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!

द्यायचंच असेल तर देऊ
ओठांवर हसू, कधी उदास असू,
तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला
अशा आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

Tuesday, September 28, 2010

Friday, August 13, 2010

असही प्रेम असत….

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

Thursday, August 12, 2010

एकदा वाटल…!

एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव,
पण नंतर वाटल तुझ
तुला कळतय का ते पहाव,

जेव्हा तुझी आस असायची
तेव्हा तूच निराश करायचास,
अन जेव्हा आस मनी नसायची
तेव्हा सुद्धा तूच मनात ज्योत जागवायचास,

मनाच्या समुद्रात उठलेल्या
वादळला तूच प्रवृत्त करायचा,
तर कधी त्याच वादलाला
शांत सुद्धा तू करायचास,

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
साथ तुझी असावी,
दुरावलेल्या माझ्या भावनानी
सांगड़ तुझ्या हृदयाशी घालावी,

कधी हो तर कधी नाही
कधी आपुलकी तर कधी दुरावा,
गोंधळलेल्या मनाचा हात
मी तरी कसा धरावा,

म्हणून एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव…

Wednesday, August 11, 2010

तुझे नी माझे नाते काय?…

तुझे नी माझे नाते काय?…
तु देणारी मी… मी घेणारा
तु घेणारी… मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय?….
तुझे नी माझे नाते काय?…

सुखदु:खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?…

नात्याला या नकोच नाव
दोघान्चही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघान्मधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसयाचा पाय?
तुझे नी माझे नाते काय?…

मीच असेल……

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

‘सांगू कसे तिला हे?

पाहिलं तुला ज्यादिवशी
झालो तुझा दिवाना,
काय झाली माझी हालत
तुम्ही जरा पहा ना…!

काय झाला हो कहर,
जेव्हा भिडली ही नजर !
एक ह्रदय होते साधे,
ते राहिले ना माझे…!!!

अचानक एके दिवशी
आली ती मजपाशी,
“होशील का मित्र माझा?”
म्हणुनी लाजली जराशी

होकार देऊनी तिजला
आलो मी माझ्या घरला,
न अन्न-पाणी काही
मी ध्यास तिचा धरला…!!!

होई मग रोज भेटी
जिव माझा तिच्यात जडला,
‘सांगू कसे तिला हे?’
हा प्रश्न मला पडला
प्रितीच्या नावेला आता
उफान मोठा चढला…!

सांगणार आज सगले
मी हे मग ठरविले,
‘नाही’ म्हणेल म्हणुनी
मनाने मज अडविले…

सोडुनी गेली जग हे
कळले अचानक मजला,
दिवा हा कसा रे
इतक्यात असा विझला…

कळता क्षणीच माझ्या
बसला मनास चटका,
असा कसा अचानक
झाला दगाफटका…

सांगणार होतो ‘प्रीती’
हात घेउनी तुझा हाती,
सांगेन म्हणता म्हणता
सगलेच उरले बाकी….!!!